Exam dates for JEE Main 2022 announced; Registration process begins
JEE मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, नोंदणी प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली : JEE मुख्य परीक्षेच्या तारखा राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) जाहीर केल्या आहेत.
JEE परीक्षेचं पहिल सत्र एप्रिलमध्ये, तर दुसरं सत्र मे महिन्यात होणार आहे. १६ ते २१ एप्रिल, आणि २४ ते २९ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. यासाठी ३१ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. अधिक माहिती जेईई मेन डॉट एनटीए डॉट एन आई सी डॉट इन ( jeemain.nta.nic.in ) या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल तसंच ०११-६९ २२ ७७ ०० आणि ०११- ४० ७५ ९० ०० या मदत क्रमांकांवर संपर्क साधता येईल