The examination for the post of Constable of the Central Armed Police Force can now also be conducted in 13 regional languages
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता १३ प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार
20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी ही परीक्षा देणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने (MHA) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी 01 जानेवारी 2024 पासून हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाकरीता परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परिक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी या भाषांचा समावेश असल्याचं मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
येत्या २० फेब्रुवारीपासून ते ७ मार्च २०२४ या कालावधीदरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा होईल. यासाठी सुमारे ४८ लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता १३ प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार”