Exemption in fees up to degree or postgraduate level.

Students whose parents died due to Covid 19 are exempted from full fees up to degree or postgraduate level.

Students whose parents have died due to the outbreak of Covid 19 are being exempted from paying the entire fee till the completion of undergraduate/postgraduate education, Higher and Technical Education Minister Uday Samant announced at a press conference here today. 

Minister Mr Samant said that among the other charges levied for all the courses in the subsidized colleges and university departments are gymkhana fees, various merit/activity fees, college magazine fees, computer fees, sports funds, medical aid funds, and youth festivals. The charges for those items will be completely waived. 

Higher and Technical Education Minister Uday Samant
Higher and Technical Education Minister Uday Samant

Students whose parents died due to the outbreak of Covid 19 are exempted from full fees up to the undergraduate or postgraduate level.   

University and aided college students waived other fees

 

Higher and Technical Education Minister Uday Samant

 

As maintenance of the laboratory and library and purchase of e-content in the library has been spent, a 50 per cent discount will be given in this regard. As the dormitory is not being used by the students, the dormitory charges will be completely waived.

Exemption from tuition fees and development funds levied by unsubsidized/permanent unsubsidized colleges but other fees such as gymkhana fees, various merit/activity fees, college magazine fees, computer fees, sports funds, medical aid funds and youth festivals. Charges for items that have not been charged will be fully waived. Similarly, 50 per cent discount will be given on laboratory and library fees, said Mr Samant.  

कोविड १९ मुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तरपर्यंतचे पूर्ण शुल्क माफ.

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 

मंत्री श्री.सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. 

Higher and Technical Education Minister Uday Samant
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी किंवा पदव्युत्तरपर्यंतचे पूर्ण शुल्क माफ. 

विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ.

 

– उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत .

 

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे व वसतिगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. 

विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५०  टक्के सवलत देण्यात येईल,  असेही श्री.सामंत यांनी सांगितले. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *