Explore the possibility of starting 10th-12th class in Corona free village.

Explore the possibility of starting 10th-12th class in Corona free village – Chief Minister Uddhav Thackeray

A meeting of the school education department was held under the chairmanship of the Chief Minister. Chief Minister Uddhav Thackeray today directed the department to look into the possibility of starting Class X-XII in villages that have been corona-free for the last few months and will ensure that villages remain corona-free in future also.

CM Uddhav Thakre
Chief Minister Uddhav Thackeray

He was speaking at a meeting of the school education department chaired by the Chief Minister here today. The meeting was attended by School Education Minister Prof. Varsha Gaikwad, Chief Secretary Sitaram Kunte, Additional Chief Secretary to the Chief Minister Ashish Kumar Singh, Additional Chief Secretary to the School Education Department Vandana Krishna, Principal Secretary to the Chief Minister Vikas Kharge, Secretary Abasaheb Jarhad and other senior officials of the school education department.

The meeting also discussed starting 10th and 12th classes in the villages which have been corona free for the last few months and will ensure that the village is corona free by strictly following the measures to keep the village corona free in future also.

Prof. Varsha Gaikwad informed that a plan is being proposed by the school education department to bear the educational expenses of the students who have lost both their parents due to corona. The Chief Minister has responded positively to this and instructed that the proposal along with the required funds should be submitted to the Cabinet for approval.

While evaluating the marks of 12th standard students, the Chief Minister also said that a study proposal should be submitted on the basis of the 12th standard assessment announced by CBSE as well as a comparative study of the method of assessment fixed by the state for the 10th standard.  

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागानेतपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षणमंत्री     प्रा.वर्षा गायकवाड,  मुख्य सचिव सीताराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव  वंदना कृष्णा,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Uddhav Thakre
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. 

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा.वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *