Under the theme of ‘Expression of Vote’ three competitions namely advertisement making, poster and slogan making
‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा
मतदार जागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन
स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे
पुणे : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी करुन घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
युवावर्ग आणि मताधिकार, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असे या या स्पर्धांचे विषय आहेत. तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे आहे.
या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 1 लाख रुपये, दुसरे पारितोषिक 75 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी 10 हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार, दुसरे 25 हजार, तिसरे पारितोषिक 10 हजार रुपयांचे आणि 5 हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार, दुसरे पारितोषिक 15 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये तर प्रत्येकी 5 हजार रुपयाची दोन उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत, अशी माहिती पुणे जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मतदार जागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ या विषयांतर्गत तीन स्पर्धा”