Extension till 31st August 2021 for recalibration of rickshaw fare meters.

Extension till 31st August 2021 for recalibration of rickshaw and taxi fare meters.

It has been decided to extend the deadline for recalibration of rickshaw and taxi fare meter till 31st August 2021 and keep the revised official tariff card valid till then, considering the outbreak of corona and government directives under ‘Break the Chain’. ) Has been informed through a press release. In the meeting of the Mumbai Metropolitan Region Transport Authority on 22/02/2021, it was decided to give fare hikes to auto rickshaws and taxi drivers. 

However, due to the increasing prevalence of corona, auto-rickshaw/taxi meter recalibration could not be carried out from 15th April 2021 as per the instructions of the government. Was introduced. In this meeting, it has been decided to extend the deadline for recalibration of rickshaw and taxi fare meter till 31st August 2021 and to keep the revised official tariff card admissible till then.

However, all auto rickshaws and taxi owners/drivers should recalibrate auto rickshaws and taxi meters within the prescribed period subject to the decision of the government under break the chain, the Regional Transport Officer Mumbai (Central) has appealed in a press release.

रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ. 

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२/०२/२०२१ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला व या भाडे वाढीकरिता ऑटो रिक्षा/टॅक्सी यांचे मिटर रिकॅलिब्रेशन करणेकरिता ३१ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती व तोपर्यंत सुधारित टेरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Bajaj Auto Riksha
रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ.

तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशनचे कामकाज १५ एप्रिल २०२१ पासून होऊ न शकल्याने ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ३१ मे २०२१ रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारित अधिकृत टेरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.

 

तरी सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक/चालक यांनी ब्रेक द चेन अंतर्गत शासनाच्या निर्णयाशी अधीन राहून विहित कालावधी मध्ये ऑटो रिक्षा व टॅक्सी मीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *