Extension till 31st May 2021 for students to apply for scholarships through MahaDBT portal.

Extension till 31st May 2021 for students to apply for scholarships through MahaDBT portal.

For the year 2021, the deadline has been extended for students to apply for scholarships from the MahaDBT portal, as well as to verify the relevant application information at the college and department level. This includes 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education on the MahaDBT portal developed for the joint implementation of scholarship schemes of various departments of the State Government.

For those who are eligible for the scholarship scheme for the academic year 2021 but have not yet applied, the deadline has been extended till May 31, 2021 to apply through the MahaDBT portal. This is the last chance given to the students to fill the application for the 2021 academic year. No further extension will be given and eligible students will be informed through their college institute university to fill up the application for the scholarship in time. Universities and colleges have been informed by the Directorate General of Higher Education.

महाडीबीटी पोर्टल वरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ. 

सन २०२१ करिता महाडीबीटी पोर्टल वरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे, तसेच संबंधित अर्जाची  माहिती महाविद्यालय व विभाग स्तरावरून पडताळणी करणे बाबत मुदतवाढ देण्यात आली आहे.   राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी करण्यासाठी विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टल वर उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांचा  यात समावेश आहे. 

सदरहू शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१ करिता पात्र असूनही अद्याप  ज्यांनी अर्ज केले नसतील  अशा विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  २०२१ शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ही  शेवटची संधी देण्यात आलेली आहे.  यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी त्यांचे महाविद्यालय संस्था विद्यापीठ यांच्यामार्फत कळवण्यात येईल. उच्च शिक्षण महासंचनालय यांच्यातर्फे   विद्यापीठ आणि महाविद्यालयांना असे कळविण्यात आले आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *