The deadline for submission of applications for the foreign scholarship scheme extended till June 18.
Scholarships under the Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme are provided annually by the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra to students belonging to Scheduled Castes, Nava Buddhists who have been admitted for special studies abroad. The main objective of the scheme is to provide financial assistance to Scheduled Caste boys and girls for specialized study of postgraduate and research courses (PhD) abroad. Students are invited to apply for foreign scholarships for the academic year 2021-22 and the deadline for submission of applications has been extended till June 18, 2021.
Under this scheme, the scholarship will be sanctioned to 75 students who have been admitted to foreign educational institutions within the Scheduled Caste category in Maharashtra for post-graduate degree and up-to-date (Qs World University Ranking) 300. Students should download the application in the prescribed format from the official website of the government www.maharashtra.gov.in. The complete application should be sent to swfs.applications.2122@gmail.com and its hard copy should be submitted within the prescribed time and with the required documents to the address of Social Welfare Commissionerate 3, Church Path, State of Maharashtra, Pune-411001.
Students who are eligible for the scheme will get benefits like airfare, tuition fees of educational institutions abroad, subsistence allowance, contingency expenses etc. The scholarship will not apply to more than two students from the same family. The maximum age limit will be 35 years for postgraduate courses and 40 years for PhDs. Only MD and MS courses on the Indian Council of Medical Sciences website are eligible for admission. Annual income should not exceed Rs. 6 lakhs. Visit the website for more information.
परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 18 जूनपर्यंत मुदतवाढ.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय.सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षा करिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास दिनांक १८ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत,महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qs World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरून डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ईमेलवर पाठवून त्याची हार्ड कॉपी विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर सादर करावा.
योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च इत्यादी लाभ मिळणार आहेत. एकाच कुटूंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. वार्षिक उत्पन्न रु.6 लाखापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.