Extension till May 30 for applying for the MSBTE diploma examination.
Diploma examinations conducted by the Maharashtra State Board of Technical Education will be held in July-August. The Maharashtra State Board of Technical Education has decided to extend the deadline for applying for this summer exams till May 30 . https://msbte.org.in/file/ExtensionofS-21examformschedule_18052021.pdf
Dr. Mahendra Chitlange, Secretary, MSBTE, said that the extension was being given in view of the demand for extension from various institutions in the wake of the cyclone. The application process for the summer examination of technical education is currently in progress and the deadline was extended in view of the lockdown imposed earlier on the corona background. Now that the second extension has been extended, it will be possible for students to fill up the application form on time. Students can apply online from May 26 to 30 on the website.
Exam application forms have been made available to the students in the student login on the website through MSBTE. Students are required to fill in their mobile number and e-mail ID while filling up the exam form. As the information regarding the exam will be sent to the mobile number and e-mail id filled in the form by the students, both these things should be mentioned accurately by the students, an appeal has been made through MSBTE. ( https://msbte.org.in/)
एमएसबीटीई डिप्लोमा परीक्षा अर्ज करण्यासाठी 30 मे पर्यंत मुदतवाढ.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहेत. या उन्हाळी परीक्षांसाठी अर्ज करण्याला 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतला आहे. https://msbte.org.in/file/ExtensionofS-21examformschedule_18052021.pdf
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी विविध संस्थांकडून होत होती त्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे एम एस बी टी इ चे सचिव डॉक्टर महेंद्र चितलांगे यांनी सांगितले. सध्या तंत्र शिक्षणाच्या उन्हाळी परीक्षा साठी अर्ज भरण्याची प्रतिक्रिया प्रक्रिया सुरू आहे व यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी चा विचार करता मुदत वाढ देण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा मुदतवाढ ेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरणे शक्य होणार आहे विद्यार्थ्यांना 26 ते 30 मे कालावधीत ऑनलाईन पद्धतीने वेबसाइटवरून अर्ज करता येईल 26 ते 30 मे या कालावधीत संस्थांवर अर्ज निश्चित करणे संस्था स्तरावर अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे त्यानुसार संबंधित संस्था व विभागीय कार्यालयाने कार्यवाही करावी.
एमएसबीटीई’मार्फत वेबसाइटवरील स्टुडंट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हा परीक्षा अर्ज भरताना स्वत:चा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये भरलेल्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर परीक्षाविषयक माहिती पाठवली जाणार असल्याने, या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अचूकपणे नमूद कराव्यात, असे आवाहन ‘एमएसबीटीइ’मार्फत करण्यात आले आहे.( https://msbte.org.in/)