रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Deadline to apply for fair price shop licenses extended to September 1

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुणे ग्रामीण मधील १३ तालुक्यांमध्ये २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा १ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी १ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पायाभूत सुविधांचा पुनर्विकास करतांना, कोल्हापूरची ऐतिहासिक वैशिष्ट्ये अधोरेखित केली जातील
Spread the love

One Comment on “रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *