Senior jurist Fali Nariman passed away
ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं निधन
1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली : ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं आज नवी दिल्ली इथं वार्धक्याने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून १९७१ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर १९७२ ते १९७५ या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
फली नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली आणि नंतर ते दिल्लीला गेले. नरिमन यांनी सुमारे 70 वर्षे वकिली केली.1950 ते 1972 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, फली नरिमन यांनी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या खटल्यासह अनेक ऐतिहासिक खटल्यांचा युक्तिवाद केला.
नरिमन यांना जानेवारी 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
फली नरिमन यांनी घटना तसंच न्यायसंस्था मजबूत करण्यासाठी केलेलं काम नेहमीच आठवणीत राहील अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरिमन यांनी आदरांजली वाहिली आहे. “फली नरिमन हे देशातील बुद्धीमान आणि कायद्यांचे ज्ञान असलेल्या मोजक्या व्यक्तिमत्वांपैकी एक होते. सामान्य व्यक्तींनाही योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचलं”, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली सॅम नरिमन यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याकरता बळ देवो या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरिमन यांना आदरांजली वाहिली आहे.
कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.
कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
“फली नरीमन हे महान कायदेतज्ज्ञ आणि विचारवंत होते. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांसह माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.”
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, देशाने बुद्धीमान आणि ज्ञानातील महान व्यक्तिमत्व गमावले आहे. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही फली नरिमन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि याला एका युगाचा अंत असल्याचे म्हटले.
भारताचे सरन्यायाधीश (CJI ) धनंजय चंद्रचूड यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. फली नरिमन यांच्या दुःखद निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, असे त्यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये (SC ) दिवसाचे कामकाज सुरू करताना ॲटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांना सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं निधन”