Bhumi Poojan of Female Students’ Hostel in Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधितून साडेआठ कोटी रुपयांचा निधी
पुणे: ‘मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे. एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असे प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहाचे भूमिपूजन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री किरण इंदलकर, मुख्य वसतिगृह प्रमुख प्रा. डॉ. वर्षा वानखेडे, कार्यकारी अभियंता विजय ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, ‘पुणे विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, सिनेट मेंबर म्हणून जवळजवळ 15 वर्षे मी विद्यापीठात विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या अनुभवाचा मला पुढील राजकीय, सामाजिक जीवनात मोठा उपयोग झाला. पुणे विद्यापीठाबद्दल माझ्या मनामध्ये आत्मियता आहे. म्हणून मी ही सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला,असेही ते म्हणाले.
जावडेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या या खासदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ५६० विद्यार्थिनींची कॅम्पसवर राहण्याची सोय होणार आहे, असे कुलगुरु प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा