Seminar for guidance on financial and cyber fraud
आर्थिक व सायबर फसवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी परिसंवाद
ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि कर्वे समाजकार्य महाविद्यालय, कर्वेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्वे समाजकार्य महाविद्यालय येथे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येणार आहे. सायबर गुन्हेगारीद्वारे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रमाण पाहता ज्येष्ठ नागरिकांना जागरुक करण्यासाठी ‘आर्थिक, सायबर गुन्हे मार्गदर्शन व परिसंवाद’ याप्रसंगी आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व्यतीत करता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्याचे सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याअनुषंगाने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपआयुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, कर्वे समाज सेवा संस्था संस्थेचे विश्वस्त मधुकर पाठक यांची प्रमुख उपस्थिती असेल. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आर्थिक व सायबर फसवणुकीविषयी मार्गदर्शनासाठी परिसंवाद”