पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके.

First National Voter Contest, Win Cash Prizes.

पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके.

मुंबई : सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विशद करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पेवर आधारित मतदार जागृतीFirst National Voter Contest, Win Cash Prizes. स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वीपद्वारे मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोग हा नेहमीच लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून लोकशाही बळकट करत असतो.

भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले असून यात एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत. यात प्रश्नमजुंषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत गाण्याची स्पर्धा, व्ह‍िडिओ तयार करण्याची स्पर्धा आणि भिति्तचित्र स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून स्पर्धेच्या प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत स्वीकारण्यात येतील.

गीत स्पर्धा, व्ह‍िडिओ मेकिंग स्पर्धा आणि भिति्तचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असून संस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावयायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिचे उदरनिवार्हाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्ह‍िडिओ मेकिंग/भित्तीचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/वि्हडिओ मेकिंग/भिति्तचित्र हा छंद म्हणून करत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

गीत स्पर्धा, व्ह‍िडिओ मेकिंग स्पर्धा आणि भिति्तचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

घोषवाक्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून तीसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ http://ecisveep.nic.in/contest/ ला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका दिनांक 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे भारत निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *