निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी

Mantralaya मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Forgery of the Chief Minister’s signature on statements

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.Mantralaya मंत्रालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन

Spread the love

One Comment on “निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *