Opportunity for free training under the ‘CM Maha Arogya Skills Development Training’ program.
In order to build skilled manpower in the health sector against the backdrop of the Covid-19 virus outbreak, the ‘CM Maha Arogya Skills Development Training Program’ for the year 2021 will be implemented in the district by the District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Pune.
Through this program, on-the-job training will be imparted to 1000 candidates in the age group of 15 to 45 years who are interested in working in the health sector through various government and private hospitals in the district as well as medical education institutes. The training imparted under this program is completely free of cost to the candidates and post-training certification as well as employment can be easily available. To participate in the training, candidates need to register through the Google form available at https://forms.gle/SdLLxFSSx45yB63G9.
More and more candidates from the district should register their participation in the ‘Chief Minister Maha Arogya Skill Development Training’ program. For more information, please contact the office on 020-26133606 or email punerojgar@gmail.com. Anupama U. Pawar, Assistant Commissioner, Skill Development, Employment and Entrepreneurship, Pune.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी.
कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उभारणी करण्याकरिता, जिल्ह्यामध्ये सन 2021 साठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे ह्यांच्या तर्फे राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या, 15 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी दवाखाने तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थेमार्फत 1 हजार उमेदवारांना ऑन जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे नि:शुल्क असून प्रशिक्षण पश्चात प्रमाणीकरणासह रोजगार देखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो.
प्रशिक्षणास सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी https://forms.gle/SdLLxFSSx45yB63G9 या लिंकवर उपलब्ध असणा-या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहिती करिता कार्यालयाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन सौ. अनुपमा उ.पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, पुणे यांनी केले आहे.