G.D.C. & A. as well as C.H.M. Exam results announced
जी.डी.सी. अँड ए. तसेच सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे : सहकार आयुक्त व निबंधक संस्था कार्यालयामार्फत शासकीय सहकार, लेखा पदविका व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम.) परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
परीक्षेचा निकाल पीडीएफ स्वरूपात https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘महत्वाचे दुवे’ मधील ‘जी.डी.सी. अँड ए. मंडळ’ येथे पहावयास उपलब्ध राहील.
फेरगुण मोजणीसाठी २३ जानेवारी पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. त्यासाठीचे प्रती विषय ७५ रुपये फेरगुणमोजणी शुल्क बँक शुल्कासह भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे भरावे.
बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करून घेण्याची मुदत २३ जानेवारी तर चलन बँकेत कार्यालयीन वेळेत भरण्याची मुदत २५ जानेवारी राहील. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असे जी.डी.सी. अँड ए. बोर्डाचे सचिव तथा राज्याचे सहकारी संस्थाचे उपनिबंधक यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “जी.डी.सी. अँड ए. तसेच सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर”