42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा जप्त

Directorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Around 211 kg of ganja worth over Rs 42 lakh seized

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर शाखेने 42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा केला जप्तDirectorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नागपूर: एका महत्त्वपूर्ण कारवाईत नागपूरमधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकार्‍यांनी 16 सप्टेंबरच्या पहाटे नागपूरजवळील मौदा टोल (महाराष्ट्र) येथे ट्रॉलीसह ट्रॅक्टर रोखत

ट्रॉलीची सखोल तपासणी केली. त्यावेळी अधिकार्‍यांना ट्रॉलीच्या तळाशी खास तयार केलेला कप्पा आढळला. या कप्प्यात 100 पॅकेजेसमध्ये तब्बल 211 किलोग्रॅम गांजा लपवून ठेवण्यात आला होता, ज्याची अंदाजे किंमत 42.2 लाख रुपये आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांच्या दक्ष पथकाने या वाहनातून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू असून या बेकायदेशीर गांजाचे मूळ आणि इच्छित गंतव्यस्थानाचा तपास करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी काम करत आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
एलआयसी एजंटस आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपाययोजनांना मान्यता
Spread the love

One Comment on “42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा जप्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *