Apply for Examination of G.D.C. and C.H.M.
जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत तसेच बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविली
परीक्षा राज्यातील १६ परीक्षा केंद्रावर २४, २५ व २६ मे रोजी घेण्यात येणार
पुणे : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थामार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा (जी.डी.सी. ॲण्ड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) परीक्षा राज्यातील १६ परीक्षा केंद्रावर २४, २५ व २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्था उपनिबंधकांनी (प.व प्र.) दिली आहे.
ही परीक्षा मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे. जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम. परीक्षा-२०२४ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत तसेच बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन”