जेनेरिक औषधी केंद्रामधून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीला जेनेरिक औषधे उपलब्ध.

Generic Medicines Outlets provide generic medicines to common people at affordable prices.

जेनेरिक औषधी केंद्रामधून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीला जेनेरिक औषधे उपलब्ध.

नवी दिल्ली: देशात सर्वसामान्य जनतेला, परवडणाऱ्या किमतीला उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने, केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागानेPradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana 2008 सालीप्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत,  नागरिकांना स्वस्त दरात, उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी देशभरात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. मार्च  2025 पर्यंत देशभरात अशी 10,500 केंद्रे सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

देशात,31 डिसेंबर 2021 पर्यंत, सुमारे 8,640 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यापैकी 276 जन औषधी केंद्रे बिहार राज्यात आहेत.

जेनेरिक औषधी म्हणजे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे देखील असतात. सध्या 1,451 औषधे आणि शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या 240 वस्तू जेनेरिक स्वरूपात उपलब्ध आहेत.

यात सर्व महत्वाच्या उपचारात्मक औषधांचा समावेश आहे. यात, कार्डिओव्हॅस्क्यूलर म्हणजे हृदयरोग, कर्करोग विरोधी, मधुमेह विरोधी, संसर्ग रोखणारी औषधे, ऍलर्जी प्रतिबंधात्मक औषधे, जठराशी संबंधित आजारावरील औषधे,निसर्गोपचाराशी संबंधित औषधे अशा सर्व औषधांचा समावेश आहे. देशभरात सुरु असलेल्या 8,600 प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून ही सगळी औषधे उपलब्ध आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *