The State Government is committed to the rapid and comprehensive development of Pune.
The state government is committed to the development of the newly included area within the Pune municipal limits and all the departments should work in coordination and cooperation to sort out the pending issues of this area immediately, directed Deputy Chief Minister Ajit Pawar today.
Under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar, a meeting was organized on various issues of Pune city in his committee hall of the Ministry. The meeting was attended by ministers of various departments, senior officials and people’s representatives.
All the departments should work in coordination and cooperation to solve the problems of Pune city
immediately – instructions of Deputy Chief Minister Ajit Pawar.
The Deputy Chief Minister instructed in the meeting to take immediate steps to rehabilitate the old dilapidated buildings of MHADA in the Pune Municipal Corporation limits and also to transfer the schools and Anganwadis in the villages included in the boundaries to the Pune Municipal Corporation. Deputy Chief Minister Ajit Pawar also instructed to send a proposal for transfer of Shivane, Uttamnagar, Kondhawe-Dhawade water supply schemes of Maharashtra Jeevan Pradhikaran and also for transfer of Agrasen school land to NMC like Balgram in Pune Municipal Corporation Development Plan. He also reiterated the commitment of the state government for the rapid and comprehensive development of Pune city.
पुण्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला विविध विभागाचे मंत्री,वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.
पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.