Sharad Pawar asserted that the parties in the Mahavikas Aghadi have no problem in fighting the upcoming assembly elections together
महाविकास आघाडीतल्या पक्षांना आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्यात अडचण नसल्याचं शरद पवार यांचं प्रतिपादन
कोल्हापूर : येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांना एकत्र येऊन निवडणूक लढण्यास कोणतीही अडचण येणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सध्या पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला.
यासंदर्भात महाविकास आघाडीनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेवर सत्ताधारी पक्षांनी टीका केली. मात्र त्यांची ही यात्रा पक्षापुरती राहिली नाही. सर्वसामान्य लोक, विविध पक्षांचे लोक त्यामध्ये सामील झाले. अनेक संस्थांचे पदाधिकारी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचं पवार यांनी सांगितलं.
राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा होईल असंही ते म्हणाले. सध्याचे राज्यपाल चुकीची वक्तव्य करत आहेत. राज्यपाल हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नसल्याचं पवार म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com