भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं निधन

A senior leader of Bharatiya Janata Party MP Girish Bapat passed away भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Senior leader of Bharatiya Janata Party MP Girish Bapat passed away

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं निधन

टेल्को कंपनीत कामाला असलेले गिरीश बापट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आपल्या सार्वजनिक आयुष्याला सुरूवात
1980 साली त्यांची पुणे शहर भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.
नगरसेवक ते खासदार असा होता प्रवास
1983 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढे ते 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले
1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.
2014 साली देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
2019 ला पुण्याचे खासदारA senior leader of Bharatiya Janata Party MP Girish Bapat passed away भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते 73 वर्षांचे होते.  पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता पुण्याच्या वैकूंठ भूमी स्मशानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गिरीश बापट आणि पुणे हे भाजपसाठी समीकरण बनलं होतं. गिरीश बापट यांनी जवळपास 30वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे.

सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

बापट 1973 पासून राजकारणात सक्रिय होते. 1983 ला ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले होते.

गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

गिरीश बापट हे पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणारे आणि लोकांच्या हितासाठी काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाचं दुःख असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

गिरीश बापट यांनी महाराष्ट्राच्या तसंच पुण्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं असून त्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली असून शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि संघटनेच्या हितासाठी ते समर्पित राहिले असं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

पुण्याचे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचं दु:ख असून त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

पुण्याचे लोकप्रिय खासदार श्री गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख असून त्यांच्या निधनामुळे राज्यानं एक लोकप्रिय नेता आणि अनुभवी संसदपटू गमावला आहे असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातलं एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे पक्षाला ऊर्जा देण्याचं काम करत होते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

पुण्यात भाजपच्या जडणघडणीत आणि पक्ष मजबूत करण्यात गिरीश बापटांचे मोठे योगदान होते असा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गिरीश बापटांना आदरांजली वाहिली आहे.

गिरीश बापट यांचं निधन हे सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का असून त्यांच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी शोक व्यक्त केला आहे.

गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या निधनानं पक्षाचा आधारवड हरपला आहे असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *