258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

Social Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Distribution of caste validity certificate to 258 students

258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

समता पर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरणSocial Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : प्रत्येक मागास वर्गीय व्यक्तीस शिक्षण सेवा निवडणूक व इतर संविधानिक लाभ आरक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करून घेताना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. अनेकदा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना संविधानिक लाभ घेता येत नाही.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन केले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून २५८ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासोबतच संविधान उद्देशिकेचेही वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *