India defeat West Indies by 3 runs, lead series 1-0
वेस्ट इंडीजविरुद्ध ५० षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय
पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडीजविरुद्ध ५० षटकांच्या तीनपैकी पहिल्या सामन्यात भारतानं ३ धावांनी विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिजचा ३ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पोर्ट ऑफ स्पेन इथल्या क्वीन्स पार्क मैदानावर काल झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमोर ३०९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघ ६ बाद ३०५ धावांपर्यंत पोहोचला त्यामुळं हा सामना अतिशय चुरशीचा झाला.
फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारताने कर्णधार शिखर धवनच्या 99 चेंडूत सर्वाधिक 97 धावा करत 7 बाद 308 धावा केल्या. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अनुक्रमे 64 आणि 54 धावा केल्या.
येथे विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 50 षटकांत 6 बाद 305 धावाच करता आल्या. घरच्या संघाकडून काईल मेयर्सने सर्वाधिक 75 धावा केल्या, तर शमारह ब्रूक्स आणि ब्रँडन किंग यांनी अनुक्रमे 46 आणि 54 धावा केल्या.
भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com