भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २ गडी राखून केला पराभव

India defeated West Indies by 2 wickets in the second ODI भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India defeated West Indies by 2 wickets in the second ODI

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २ गडी राखून केला पराभव

सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम

तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी

क्वीन्स पार्क ओव्हल: क्रिकेटमध्ये, काल रात्री त्रिनिदादच्या (Trinidad) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल (Queen’s Park Oval) येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI Match)सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. India defeated West Indies by 2 wickets in the second ODI भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये वेस्‍ट इंडिजवर भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय आहे. या विजयाने भारतीय संघाने सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम केला आहे. याआधी एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता.

३१२ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४९.४ षटकात ८ विकेट गमावत ३१२ धावा केल्या. पाहुण्यांसाठी अक्षर पटेलने नाबाद ६४ धावा केल्या आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याने ७१ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६३ धावा केल्या.

भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचणारा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) अखरेच्या काही षटकात वादळी खेळी करत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ३११ धावा केल्या. सलामीवीर शाई होपने ११५धावा केल्या तर कर्णधार निकोलस पूरनने ७४ धावा केल्या.

वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होप आपल्या १०० व्या वनडेत शतक झळकावणारा दहावा फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज आहे. भारतासाठी शार्दुल ठाकूरने ५४ धावांत ३ बळी घेतले. विजयात महत्वाची भूमिका बजावणारा अक्षर पटेलला (३५ चेंडूत ६४ धावा) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

तिसरा आणि शेवटचा वनडे बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *