उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी

Everyone should pledge to save every drop of water for a bright future – Prime Minister

उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी – प्रधानमंत्री

आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजराWorld Water Day Hadapsar News केला जातो.

जागतिक पातळीवरील जल संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आणि  “२०३०पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता” हा यामागचा हेतू आहे. “आटलेल्या भूजलाचं पुनरुज्जीवन” ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे. दरम्यान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकानं न्यायीक भावनेनं पाण्याचा वापर करायला हवा. शाश्वत विकासासाठी पाणी महत्त्वपूर्ण घटक आहे, असं नायडू यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्य ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचं प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *