Reserve Bank of India will now issue an approved list of all valid apps
आरबीआय सर्व वैध अँप्सची मंजूर यादी जारी करणार
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक आता सर्व वैध अँप्सची मंजूर यादी जारी करणार असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे सुनिश्चित करणार आहे की केवळ वैध अँप्स अँप्सटोअरमधे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.
हा निर्णय काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कर्ज अँप्सशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. मनी लाँड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अशा बेकायदेशीर खात्यांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवेल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
रिझर्व्ह बँक निष्क्रीय नसलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थाचं सदस्यत्व रद्द करेल जेणेकरून त्यांचा गैरवापर थांबेल.
रिझर्व्ह बँक हे देखील सुनिश्चित करेल की पेमेंट गटांची नोंदणी एका विहित कालावधीत पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत पेमेंट गटाला काम करण्याची परवानगी मिळालेली नाही.
गैरवापर टाळण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला बनावट कंपन्यांची ओळख रद्द करण्यास आणि त्यांची नोंदणी रद्द करण्यास सांगितले आहे. सीतारामन यांनी समाजातील दुबळ्या आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना उच्च व्याजदरांवर कर्ज देण्याच्या तसंच धाक दाखवून वसुली करण्याच्या पद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी कर्ज देणाऱ्या समूहांद्वारे डाटा गोपनीयतेचं उल्लघंन, कर चुकवेगिरी याकडे लक्ष वेधलं. त्यांनी उपभोगत्यांच्या, बँक कर्मचाऱ्यांच्या आणि कायद्याचं पालन करणाऱ्या संस्था तसंच इतर खातेधारकांच्या सायबर जागरुकतेत वाढ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल आहेत.
आर्थिक कार्यविभागाचे सचिव, बँकींग विभाग सचिव, कार्पोरेट आणि सूचना प्रौद्योगिकी सचिवांनी या बैठकीत भाग घेतला होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com