Serum Institute announces reduction of rates for Covishield enhancer doses
कोविशील्डच्या वर्धक मात्रेसाठीचे दर कमी करण्याची सीरम इन्स्टीट्यूटची घोषणा
कोविशील्डच्या वर्धक मात्रेसाठीचे दर कमी करण्याची घोषणा सीरम इन्स्टीट्यूटनं केली आहे.
कोविशील्डची वर्धक मात्रा खासगी रुग्णालयांना २२५ रुपयात देणार असल्याचं सीरमचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आज सांगितलं. याआधी या लसीसाठी प्रती मात्रा ६०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, भारत बायोटेकच्या सहसंस्थापक सुचित्रा इला यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून कोवॅक्सिनचा दरही प्रती मात्रा २२५ रुपये करण्याचं जाहीर केलं आहे. खाजगी रुग्णालयांसाठी आधी कोवॅक्सिनचा दर १२०० रुपये होता.
Hadapsar News Bureau.