Sharad Pawar’s reply to Raj Thackeray’s allegations
राज ठाकरे यांच्या आरोपांना शरद पवार यांचं प्रत्युत्तर
मुंबई : राज्यातल्या सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असून काही लोक सांप्रदायिक विचारांची मांडणी जाणीवपूर्वक करत आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. मात्र जनतेनं याला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
आय एन एस विक्रांत या युद्धनौकेच्या जीर्णोद्धारासाठी गोळा केलेल्या निधीचा विनियोग कसा केला गेला, ती रक्कम सैन्यदल किंवा नौदलाला देता आली असती, मात्र तसं झालेलं दिसत नाही, हे आक्षेपार्ह आहे, अशी टीका त्यांनी केली.
या परिषदेत शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. एखादी व्यक्ती सहा महिन्यातून एकदा वक्तव्य करून आपलं मत व्यक्त करत असेल तर ते फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.
महागाई, बेरोजगारी अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज ठाकरे गप्प का? असा सवाल त्यांनी केला. आपण फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याचा ठाकरे यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. या तीनही युगपुरुषांनी शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी केली, त्यांचे विचार पुढे नेले, त्यामुळे त्यांचं नाव घेणं गौरवाचं आहे, असं पवार यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau.