Organ Donation Awareness Training by the National Service Scheme Department of the University
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून अवयवदान जनजागृती प्रशिक्षण
प्रशिक्षण विद्यार्थी कुठेही, कधीही मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ई प्रमाणपत्रही देण्यात येणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून सर्व राष्ट्रीय सेवा योजना संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अवयवदान जनजागृती प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी सांगितले.
यासाठीचे परिपत्रक काढत सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करण्यास सांगितले आहे. व्ही फॉर ऑर्गन फाउंडेशनच्या सहकार्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थी कुठेही, कधीही मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ई प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे डॉ.देसाई यांनी सांगितले.
तसेच सर्वाधिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रमुखांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर याच विषयावर आयोजित प्रश्न मंजुषेतील प्रथम दहा विजेत्यांना बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अर्थसहाय्याने शिष्यवृत्ती देण्यात येईल असेही डॉ.देसाई यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर माहिती व नोंदणी अर्जाची लिंक विद्यापीठाच्या संकेस्थळावर देण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com