७१ हजार नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वितरण

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Distribution of appointment letters to 71 thousand newly appointed government employees across the country

देशभरातल्या ७१ हजार नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण

चौथ्या रोजगार मेळ्या अंतर्गत महाराष्ट्रात अडीच हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

नारायण राणे, डॉ. भागवत कराड ,कपिल पाटील आणि रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मुंबई , नागपूर , नांदेड आणि पुणे या चार ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारमध्ये सुमारे ७१ हजार नव्यानं भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण केलं .यावेळी, प्रधानमंत्र्यांनी सर्व नवीन भरती झालेल्यां कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याची ही त्यांच्यासाठी संधी असल्याचं ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.
File Photo

विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे असं त्यांनी नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

आजच्या नवीन धोरणानं देशात नवीन संधींची दारं उघडली असून, भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि जग भारताकडे आशेने पाहत आहे यावर त्यांनी यावेळी भर दिला. नवीन नियुक्त झालेले केंद्र सरकारमध्ये ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट प्रोफेसर, शिक्षक आणि परिचारिका या पदांसह विविध पदांवर रुजू होतील.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी मध्य रेल्वेच्या वतीने आयोजित आजच्या या चौथ्या रोजगार मेळ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एकूण 2532 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली,यांपैकी एकूण 650 जणांना प्रत्यक्ष तर 1862 जणांना ईमेल च्या माध्यमातून नियुक्ती पत्रे देण्यात आली.दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड इथे आयोजित रोजगार मेळ्यात एकूण 370 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आज झालेल्या कार्यक्रमात, केंद्रीय सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 25 उमेदवारांना आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते 175 अशी एकूण 200 नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महा व्यवस्थापक अलोक सिंह ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल आणि मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासकीय प्रबोधिनी ‘यशदा’ इथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात 161 जणांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या मुख्य व्यवस्थापक रेणू दुबे आणि अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह हे यावेळी उपस्थित होते.

आजच्या तरुणांनी देश उभारणीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत भरीव योगदान देण्याचे आवाहन यावेळी आठवले यांनी केले. आजचा तरुण हा तांत्रिक क्षमतेमध्ये अग्रेसर असून त्याच्या जवळील या कौशल्याचा उपयोग समाज निर्मितीसाठी करणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले .

आज झालेल्या या रोजगार मेळाव्यात रेल्वे , बँक , संरक्षण मंत्रालय , टपाल, केंद्रीय राखीव सुरक्षा बल , हिंदुस्तान पेट्रोलियम , आदी विविध विभागातील नियुक्ती पत्रांचा समावेश आहे .

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *