Publication of books ‘Meri Rus Yatra’ and ‘Anjaliver Mitti’
‘मेरी रूस यात्रा ‘ आणि ‘अँजलिभर मिट्टी’ पुस्तकांचे प्रकाशन
विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझा रशियाचा प्रवास या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद मेरी रूस यात्रा या पुस्तकात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या दोन पुस्तकांचे गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातील सी. व्ही.रामन सभागृहात प्रकाशन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझा रशियाचा प्रवास या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद मेरी रूस यात्रा या पुस्तकात केला आहे. तर ‘अँजलिभर मिट्टी’ हा हिंदी काव्यसंग्रह आहे.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, आमदार सुनील कांबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र शिंगणापूरकर, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश पांडे, अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे, अधिष्ठाता डॉ.विजय खरे, डॉ.बाबसाहेब आंबेडकर अध्यासानाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव, डॉ.सुनील भंडगे अधिसभा सदस्य डॉ.देविदास वायदंडे, साहित्यिक डॉ.सुनील देवधर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ.संजीव सोनवणे यांनी पुस्तकाला शुभेच्छा देत मातीशी संबंध असणारी ही पुस्तके असल्याचे सांगितले. तर अण्णाभाऊंचे साहित्य हिंदीतून उपलब्ध करून दिल्याने त्याछा समाजाला उपयोग होईल असे राजेश पांडे यांनी सांगितले.
आमदार सुनील कांबळे यांनी सदानंद भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ.विजय खरे म्हणाले, आजच्या काळाशी याचा समंध लागेल इतके समृद्ध साहित्य अण्णाभाऊंचे आहे.
यावेळी डॉ.मनोहर जाधव यांनी माझा रशियाचा प्रवास या पुस्तकाविषयी सांगितले. साहित्यिक डाॅ.महेंद्र ठाकुरदास, सुप्रसिद्ध व्यंगकवी डॉ.वागीश सारस्वत, यांनी संबंधित ग्रंथावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील देवधर यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com