चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर सामरिक संवाद परिषद

A two-day strategic dialogue conference on the rise of China and its global implications चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दोन दिवसीय सामरिक संवाद परिषद हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

A two-day strategic dialogue conference on the rise of China and its global implications

चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दोन दिवसीय सामरिक संवाद परिषद

 लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह अनेक तज्ज्ञांची उपस्थिती

चीनच्या जागतिक स्थरावरील वाढत्या विस्ताराचे जगावर होणारे बहुरंगी परिणाम यावर मंथनA two-day strategic dialogue conference on the rise of China and its global implications
चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दोन दिवसीय सामरिक संवाद परिषद
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग व दिल्ली येथील सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजी यांच्या संयुक्त विद्यमाने चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दुसऱ्या सामरिक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २७ व २८ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी सांगितले की, मागील वर्षीपासून ही सामरिक संवाद परिषद आयोजित केली जात आहे.

या परिषदेच्या माध्यमातून चीनच्या जागतिक स्थरावरील वाढत्या विस्ताराचे जगावर राजकीय, आथिर्क , सांस्कृतिक असे अनेक बहुरंगी परिणाम होत आहेत. या सामरिक संवाद परिषदेच्या माध्यमातून या विषयांचे जागतिक स्थरावरील नावाजलेले तज्ज्ञ मंथन करण्याकरिता सहभागी होतात.

या परिषदेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या बीजभाषणाने होणार आहे. २७ मार्च दुपारी ४ वाजता होणाऱ्या या सत्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे , सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष जयदेव रानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे डॉ. खरे यांनी सांगितले.

२८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता परिषदेच्या दुसऱ्या सत्रात] चीनचा धोरणात्मक अजेंडा व चीनचे राष्ट्रपती शी शिंग पिंग यांच्या वाढत्या जागतिक महत्वकांक्षा व त्यांचे सामरिक हेतू समजण्याकरीता त्यांचे व्यक्तिमत्त्व समजणे गरजेचे आहे. ते समजण्या करीता त्यांच्या जडण घडणीतून त्याच्या ध्येय निश्चितेचा अंदाज आपणास येतो व त्यानुसार आपल्या राजकीय धोरणात काय बदल करावा हे समजते.

या विषयावर या सत्रात चीन मधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावले, गुजरातच्या महाराज सयाजी राव गायकवाड विद्यापीठातील प्रा.दिलीप मोहिते- प्राध्यापक डॉ.श्रीकांत परांजपे, प्राध्यापक डॉ.विजय खरे व सेन्टर फॉर चीन अनालयसिस अँड स्ट्रॅटेजिचे जयदेव रानडे आदी यावेळी विचार मांडणार आहेत.

तिसऱ्या सत्रात चीनची तैवान वरील भूमिका व दक्षिण चीन सागरातील चीनच्या आक्रमिक भौगोलिक विस्तारासाठी सुरु असलेल्या हालचाली व त्याला आटोक्यात आणण्यासाठी विविध समविचारी देशांमार्फत आखल्या जाणाऱ्या योजना या धोरणावर एअर मार्शल भूषण गोखले, अमेरिकन दूतावासाचे जिम विल्सन, टोकियो येथील इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजिक स्टडीज केंद्राचे प्रा.डॉ.अकिमोटोदैसुके, मूळचे तैवानी असलेले व सध्या फ्लेम विद्यापीठात कार्यरत असलेले प्रा.रॉजर लिऊ, एअर मार्शल एस.एस.सोमण, प्रा.डॉ.अरविंद कुमार, आदी मार्गदर्शन करणार आहेत.

चौथ्या व शेवटच्या सत्रात भारतात वैचारिक प्रभाव प्रस्थापित करण्याकरिता चीनद्वारे अनेक स्थरांवरती प्रयत्न केले जातात प्रसार माध्यमे व सामाजिक माध्यमांद्वारे भारतापेक्षा चीन कश्या प्रकारे श्रेष्ठ आहे हे व असे अनेक पैलू रुजवाण्याकरिता प्रयत्न होतात.

या विषयावर डॉ. शेषाद्री चारी यांच्या अध्यक्षतेखाली लॉ अँड सोसायटी ऑलाईन्स चे प्रमुख एन. सि बिपिनद्रा डेमार्क मधील नेपाळचे माजी राजदूत विजय कांत कारणा, सेंटर फॉर चायना अनालयसिस चे नम्रता हासिजा, प्रा.डॉ.अरुण दळवी, लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनिस आदी यावेळी मागदर्शन करतील असे डॉ.खरे यांनी सांगितले.

नोंदणी फॉर्म: https://forms.gle/5pdrYJ4ttcEmVfFr6

https://webcast.unipune.ac.in/ या लिंक द्वारे तुम्ही थेट कार्यक्रमात सहभागी होऊ शकता .

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *