हडपसर मध्ये २, कोटी २८ लाख रु.किंमतीचा मुद्देमाल  जप्त

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

2.2 crore 28 lakh worth of goods seized in Hadapsar

हडपसर मध्ये २, कोटी २८ लाख रु.किंमतीचा मुद्देमाल  जप्त

अवैधरित्या पेट्रोल/डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश; हडपसर पोलीसांची कारवाईPune Police पुणे पोलीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हडपसर : दि.०८/०४/२०२३ रोजी पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी कॉलनी, गजानन मित्र मंडळाळजवळ, १५ नंबर चौक, हडपसर पुणे.” येथे वाशी नवी मुंबई येथुन एटीफ पेट्रोल (विमाना करीता वापरण्यात येणारे पेट्रोल) डिझेल भरुन टँकर शिर्डी एअरपोर्ट कडे जाणार आहेत. काही इसम या टँकर मधून प्लॉस्टीक कॅन मध्ये अवैधरित्या पेट्रोल व डिझेल या ज्वलनशील इंधनाची चोरी करीत आहेत.

सदरबाबतची माहीती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांना कळवून, त्यांचे आदेशान्वये सदर घटना ठिकाणी सकाळी ०६/३० वा चे सुमारास छापा टाकला असता, या ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टँकर मधील वॉल बॉक्स मधुन इंधन काढताना व  इंधनाने भरलेले १४ प्लॅस्टीकचे कॅन सापडले. त्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरता सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना बोलावून घेतले.

सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा भा.द.वि. कलम- ३७९,२८५,३४ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

अवैध रित्या पेट्रोल ची चोरी करणारे इसमांची नावे १) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिराजवळ, हडपसर पुणे. मुळ राहणार- काछा पूरेबोधराम का पुरवा, पोस्ट- दूल्हेपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश २) दाजीराम लक्ष्मण काळेल वय ३७ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार – सध्या – विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. वळई ता. माण, जि. सातारा ३) सचिन रामदास तांबे वय ४० वर्षे, धंदा- ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार – १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. व ४) शास्त्री कवलु सरोज वय ४८ वर्षे, धंदा- मजुरी, राहणार- सध्या १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. हे इसम नामे – ५) सुनिल रामदास तांबे वय अंदाजे ३८ वर्षे, धंदा- ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे.

सुनिल रामदास तांबे यांचे सांगणेवरुन आम्ही टँकरमधून पेट्रोल चोरी करीत असल्याचे सांगितले. हडपसर पोलीसांनी सदर ठिकाणाहून पेट्रोल / डिझेल चोरी करण्याचे साहित्य ०८ पेट्रोलचे टँकर, १४ पेट्रोल कॅन , इलेक्ट्रिक मोटारपंप वगैरे एकुण किंमत रुपये २,२८,०५,९९५ /- “ ( दोन कोटी अठ्ठाविस लाख पाच हजार नउशे पचांनो रु) चा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *