विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत

Image of Election process हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The fate of the candidates in the elections for five Legislative Council seats in the state is locked in the ballot box

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंदElections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान शांततेत झालं. कोकण, नागपूर आणि औरंगाबाद इथं शिक्षक मतदारसंघासाठी तर नाशिक आणि अमरावती इथं पदवीधर मतदार संघासाठी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदानाची वेळ संपल्यावरही मतदान केंद्रावर असलेल्या लोकांना चिठ्ठ्या देऊन त्यांना मतदान करु देण्यात आलं.

आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सर्वाधिक मतदान हे नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी झाल्याचं दिसून येत असून इथे सरासरी ८९ टक्के मतदान झालं असल्याची शक्यता आहे. तर नाशिक पदवीधर मतदार संघासाठी सर्वात कमी मतदान झाल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसून आलं. नाशिकमध्ये सरासरी पन्नास टक्के मतदानाचा अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

मतदानाची अंतिम टक्केवारी मतदान पूर्ण झाल्यावर येणार असली तरी कोकण शिक्षक मतदारसंघासाठी दुपारी २ वाजेपर्यंत ७० पूर्णांक ८५ शतांश टक्के मतदान झालं होतं. नागपूर शिक्षक मतदारसंघातल्या ६ जिल्ह्यांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ६० पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं होतं. नाशिक पदवीधर मतदार संंघात २ वाजेपर्यंत १७ पूर्णांक २ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती.

सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या असून विभागात सरासरी पन्नास टक्क्यापर्यंत जाईल असा प्राथमिक अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *