Border – India beat Australia in the first Test match of the Gavaskar Trophy
बॉर्डर – गावस्कर करंडकच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
रवींद्र जाडेजा सामनावीर
४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी
नागपूर: बॉर्डर – गावस्कर करंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कर्णधार रोहित शर्मा, ऑलराउंडर रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल या विजयाचे हिरो ठरले. टीम इंडियाने या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नागपूरच्या जामठा मैदानावर सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ७ बाद ३२१ या धावसंख्येवरुन पुढे सुरु झाला. तो आज ४०० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीनं पदार्पणाच्या सामन्यातचं भारताचे ७ गडी टिपले. शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांमध्ये तंबूत परतला होता. रविंद्र जडेजानं ५ आणि अश्विननं ३ गडी टिपले होते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही अवघ्या ९१ धावात संपला. आर आश्विन ने पाच तर जडेजाने ३ गडी बाद केले. दोन्ही डावांमध्ये मिळून ७ गडी टिपणाऱ्या आणि पहिल्या डावात ९ चौकारांसह ७० धावा करणाऱ्या रवींद्र जाडेजानं सामनावीराचा किताब पटकावला.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा १७फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com