74th Republic Day celebration at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा
विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यात आपला सहभाग असावा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ.विजय खरे, डॉ.दीपक माने, इनोवेशन सेलचे प्रमुख डॉ.संजय ढोले, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, कॅप्टन सी.एम.चितळे तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या तुकडीने संचलन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.सोनवणे म्हणाले, प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण आपल्या कर्तव्याचे भान ठेवायला हवे. तुम्ही विद्यार्थी हे उद्याच्या देशाचं भविष्य आहात, त्यामुळे आपण एक चांगला नागरिक होण्यासोबत देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यात आपला सहभाग असावा असेही डॉ.सोनवणे यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी विद्यापीठाने केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा देखील यावेळी डॉ.सोनवणे यांनी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com