203rd Bombay Sappers Day Celebration
203 वा बॉम्बे सॅपर्स दिवस साजरा
पॅरा ड्रॉप आणि पॅरा मोटरची प्रात्यक्षिके
पुणे : 203 व्या बॉम्बे सॅपर्स दिनानिमित्त, साहसी उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि नव्याने दाखल झालेल्या अग्निवीरांना प्रेरित करण्यासाठी, 30 जानेवारी 2023 रोजी दिघी येथे सेवारत आणि माजी लष्करी अधिकारी तसेच आर्मी एडव्हेंचर विंग च्या चमूद्वारे पॅरा ड्रॉप आणि पॅरा मोटर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रात्यक्षिकांमुळे बॉम्बे सॅपर्सना साहसी उपक्रमांमध्ये त्यांचे सामर्थ्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले तसेच याचे साक्षीदार ठरलेल्या तरुण सैनिक आणि शाळकरी मुलांमध्ये साहसाची भावना निर्माण झाली.
पॅरा रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर (पीआरटीसी ), बंगळुरू येथील आर्मी एडव्हेंचर विंगच्या चमूने सादर केलेल्या पॅरा मोटर शो ने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर पॅरा जंपमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि माजी अधिकाऱ्यांनी भाग घेतला.लेफ्टनंट जनरल वाय डिमरी, एव्हीएसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सेंट्रल कमांड, लेफ्टनंट जनरल एस. एस हसबनीस (निवृत्त), लेफ्टनंट जनरल आर. आर गोस्वामी (निवृत्त) आणि ब्रिगेडियर डीजी पटवर्धन, कमांडंट, बीईजी आणि केंद्र , खडकी ही त्यातील काही प्रमुख नावे आहेत.
राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांना तसेच गेल्या 200 वर्षांत बॉम्बे सॅपर्सच्या वैभवात योगदान देणाऱ्या प्रत्येक सेवारत आणि सेवानिवृत्त बॉम्बे सॅपरला ही खऱ्या अर्थाने योग्य मानवंदना होती.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com