आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार

Quality education is the speciality of Bharti University - Deputy Chief Minister Devendra Fadnavis गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Besides expanding the coverage of health insurance, emphasis will be placed on the inclusion of a maximum number of institutions – Deputy Chief Minister

आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार

– उपमुख्यमंत्री

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग : गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या खारघर, नवी मुंबई येथील अत्याधुनिक अशा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.Quality education is the speciality of Bharti University - Deputy Chief Minister Devendra Fadnavis गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोना संकटानंतर हेल्थकेअर क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता लक्षात आली त्यानुसार आपली वाटचाल सुरू झाली आहे.

हेल्थकेअर क्षेत्रात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला आरोग्य उपचारांसाठी निश्चित होणार आहे. इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत भारतात कमी खर्चात उपचार होवू शकतात. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही हेल्थ इन्स्टिट्यूटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आरोग्य क्षेत्रामुळे अर्थ व्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.

आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खारघर इथं सांगितलं.

आरोग्य विमा संरक्षणाखाली जास्तीत जास्त संस्थांचा पर्याय उपलब्ध असेल तर कोणत्याही व्यक्तीला कॅशलेस पद्धतीचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल असा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री जनारोग्य योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा योजनेचं संरक्षण आहे.

तसंच राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत २ लाखांच्या विम्याचं संरक्षण दिलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारनं प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधाही विस्तारित करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ़णि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *