Two were arrested in connection with a fake passports and visa racket in Mumbai
मुंबईत बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रॅकेट प्रकरणी दोघांना अटक
मुंबई : मुंबईतल्या गुन्हे शाखेनं बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी अंधेरी इथं दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून २८ बनावट पासपोर्ट आणि २४ बनावट व्हिसा जप्त केले आहेत. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरीतल्या एका फ्लॅटवर छापा टाकून १३ हून अधिक देशांचे बनावट पासपोर्ट, व्हिसा आणि इमिग्रेशन विभागाच्या शिक्क्यांसह विविध वस्तू जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.
अटक करण्यात आलेले दोघे प्रवासी अभिकर्त्यांना योग्य कागदपत्रांशिवाय परदेशात जाणाऱ्यांसाठी बनावट पासपोर्ट तयार करण्यात मदत करत होते. आरोपींनी त्यांच्याकडून प्रति पासपोर्ट एक ते पाच लाख रुपये आकारले होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com