Grand book exhibition and various literary programs
भव्य ग्रंथ प्रदर्शन व विविध साहित्य विषयक कार्यक्रम
पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती मार्फत भव्य ग्रंथ प्रदर्शन व विविध साहित्य विषयक कार्यक्रम
पुणे: मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार, संवर्धन व वैभव जपण्यासाठी पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती मार्फत स्वर्गीय पु. ल देशपांडे उद्यान ,सिंहगड रोड, पुणे येथे मा. श्री.ग.बं. देगलूरकर यांच्या शुभहस्ते भव्य ग्रंथ प्रदर्शन व विविध साहित्य विषयी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आज दिनांक २४.०१.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाले.
प्रास्ताविकामध्ये श्री.अनिल गोरे, (समिती सदस्य) यांनी मराठी भाषेची वैशिष्ट्ये,महत्त्व व मराठी भाषा किती सहज व सुलभपणे वापरता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती माधुरी सहस्त्रबुद्धे (समिती सदस्य) यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मा.डॉ.श्रीमती मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी ,(माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग) तथा मराठी भाषा अधिकारी यांनी मराठी भाषेबाबत उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. मा.श्री.श्याम भुर्के(समिती सदस्य) यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमास श्री.अरुण खिलारी, (कामगार अधिकारी) ,श्री नितीन केंजळे (कामगार अधिकारी) श्री.दामोदर उंडे ,(उपशिक्षणाधिकारी) उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शन दिनांक २४ ते २७ जानेवारी, २०२३ सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.
सदर ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथा ,कविता, कादंबरी ,नाटक ,बालसाहित्य, बोधकथा, आर्थिक ,विज्ञान, आरोग्य आध्यात्मिक, आत्मचरित्र अनुवादित, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, पर्यटन इत्यादी पुस्तके उपलब्ध आहेत.
तसेच दिनांक २४ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत कवी संमेलन, नाट्य वाचन, गीत गायन, नाट्यछटा, अभिवाचन ,कथाकथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com