भारत आणि न्यूझीलंड तिसरा एक दिवसीय सामना भारतानं जिकंला

Cricket Updates हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

India vs New Zealand 3rd ODI match India won

भारत आणि न्यूझीलंड तिसरा एक दिवसीय सामना भारतानं जिकंला

भारत आयसीसी वनडे संघात पहिल्या क्रमांकावरCricket Updates हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

इंदूर: क्रिकेटमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केले आहे. आज संध्याकाळी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात यजमानांनी किवीजचा ९० धावांनी पराभव केला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत, आज इंदूरमधे सुरु असलेल्या, तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडपुढं विजयासाठी ३८६ धावांच आव्हान ठेवलं होते.

३८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ४१.२ षटकांत सर्वबाद २९५ धावांवर आटोपला. डेव्हन कॉनवेने १०० चेंडूत १३८ धावा केल्या, तो त्याच्यासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला. हेन्री निकोल्सने ४० चेंडूंत ४२ धावा केल्या.

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या सलामीच्या जोडीनं २१२ धावांची भागिदारी करताना वैयक्तिक शतकंही ठोकली.

मंगळवारी होळकर स्टेडियमवर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने तीन वर्षांचा दुष्काळ संपविला. रोहित शर्माने तीन वर्षांत पहिले एकदिवसीय शतक केले.
शुभमन गिलनं ७८ चेंडूत ११२, तर कर्णधार रोहित शर्मानं ८५ चेंडूत १०१ धावा केल्या.

हार्दीक पंड्यानं ५४ धावांची उपयुक्त खेळी केली. विराट कोहलीनं ३६, तर शार्दूल ठाकूरनं २५ धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला निर्धारीत ५० षटकात ९ गडी गमावून ३८५ धावा करता आल्या.

न्यूझीलंडतर्फे जेकब डफी आणि ब्रेअर थिकनर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारतानं याआधीचे २ सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. रायपूरचा विजय हा भारताचा एकदिवसीय सामन्यांमधला सलग सातवा विजय होता.

आजच्या सामन्यानंतर दोन संघात तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका होणार आहे. त्यातला पहिला सामना रांची इथं २७ जानेवारीला होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *