Indian economy is expected to grow by 7 percent in the current financial year
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा
भारत ही जगातली झपाट्यानं वाढत असलेली प्रमुख अर्थव्यवस्था
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली
नवी दिल्ली : पुढच्या आर्थिक वर्षात पायाभूत स्थुल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहिल असा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा या सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.
येत्या मार्चमध्ये स्थुल राष्ट्रीय उत्पादन सुमारे साडेतीन हजार अब्ज अमेरिकी डॉलर इतकं असेल आणि भारत ही जगातली झपाट्यानं वाढत असलेली प्रमुख अर्थव्यवस्था राहिल असंही त्यात म्हटलं आहे.
ग्राहक किमंत वाढ लक्षणीय रित्या मंदावली आहे महागाईचा वार्षिक दर सहा टक्क्याच्या खाली असून घाऊक किंमतीतल्या वाढीचा दर पाच टक्क्याच्या खाली आहे . चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात वस्तू आणि सेवांची निर्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सोळा टक्के जास्त आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रात गेल्या सहा वर्षात मोठी वाढ झाली असून या क्षेत्रात वर्षाला ४ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली गेल्याचं या अहवालात नमूद केलं आहे. देशाच्या एकंदरीत विकास दरात या कृषी आणि संबंधित क्षेत्राचं मोठ योगदान असून गेल्या काही वर्षात कृषी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली. २०२०-२१ या वर्षात कृषी उत्पादनांची निर्यात, विक्रमी, ५ कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
सरकारच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाल्याचंही या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पीएम किसान योजनेमुळे एप्रिल ते जुलै २०२२ – २३ या काळात शेतकऱ्यांना ११ कोटी ३ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात साडेअठरा लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचही या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. देश जगातल्या सर्वाधिक महत्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा वितरण आणि पारेषण कार्यक्रमांमध्ये प्रामुख्यानं भागीदारी करत असून जलवायू परिवर्तनच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या कर्तव्याप्रती वचनबद्ध असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.
भारत जलवायु धोरणाच्या विकासाबाबत गंभीर असून देशानं सर्व नागरिकांचं आधारभूत कल्याण निश्चित करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि या वर्षी मार्चमध्ये भारताचा नाममात्र GDP 3.5 ट्रिलियन यूएस डॉलर असेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com