खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- 2023चे उदघाटन

The Khadi and Village Industries Commission (KVIC)

Khadi and Village Industries Festival- 2023 inaugurated

खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- 2023चे उदघाटन

मुंबई : मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग मुख्यालयात खादी महोत्सव- 23 या प्रदर्शनाचे उदघाटन, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. खादी महोत्सव- 23 हा उत्सव ज्ञ27 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत साजरा होत आहे. The Khadi and Village Industries Commission (KVIC)

आपल्या उदघाटनपर भाषणात कुमार म्हणाले, की, केव्हीआयसीवर या देशातील प्रगतीपासून दूर सर्वात मागास आणि गरीब लोकांना उपजीविका देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खादी उत्सवासारखे कार्यक्रम आणि प्रदर्शने खादी संस्था, प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना (पीएमजीपी) आणि स्फूर्ती युनिट्सना हजारो कारागिरांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत, पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात असे ते पुढे म्हणाले. देशाच्या इतर भागात तसेच परदेशातही असे उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करायला हवेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षांनी यावेळी पंतप्रधानांच्या “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन, सर्वांना केले. अध्यक्षांनी केव्हीआयसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित केले. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या अतुलनीय भारत पर्यटन महोत्सव (आयआयटीएफ, IITF)-2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 12 कोटी रुपयांची विक्री हे याचे प्रत्यक्षातील उदाहरण आहे.

यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या दिल्लीतील दुकानाने पुन्हा एकदा एका दिवसात 1.34 कोटी रुपयांच्या खादी विक्रीचा सर्वकालीन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तूंची एक लाख पंधरा हजार कोटींची विक्रमी विक्री झाली होती.

सर्वांनी खादी फेस्टला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगून देशातील गरीब विणकर, महिला आणि कसबी कारागीर यांच्या सन्माननीय कमाईसाठी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले

या खादी महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संलग्न देशाच्या विविध भागातील पीएमईजीपी युनिट्स त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.सुती खादी व्यतिरिक्त, खादी सिल्क, पश्मिना, पॉली वस्त्र, पटोला सिल्क, कलमकारी साड्या, कांजीवरम सिल्क, हलक्या वजनाच्या रेशमी मऊ सिल्क साड्या, टसर सिल्क, फुलकारी ड्रेस मटेरियल आणि खादीच्या कापडापासून बनवलेले इतर आकर्षक पोशाख, मधुबनी प्रिंट्स, सुका मेवा, चहा, काहवा, वनौषधीयुक्त सौंदर्य प्रसाधने ब्युटी आणि आयुर्वेदिक उत्पादने, मध उत्पादने, हाताने कागदाची उत्पादने, गृह सजावटीची उत्पादने, बांबू उत्पादने,चटया, कोरफडीची उत्पादने, चामड्याची उत्पादने तसेच इतर अनेक खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने उपलब्ध आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *