Launch of world’s first intranasal COVID19 vaccine
इनकोव्हॅक या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं लोकार्पण
इनकोव्हॅक या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
जगातील नाकावाटे घ्यायची ही पहिली कोविड 19 लस, म्हणजे एकप्रकारे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरवास्पद मानवंदना आहे: डॉ. मनसुख मांडवीय
विकसनशील देशांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या आजारांसाठी लस आणि औषधं विकसित करण्यात भारतानं आघाडी घेतली आहे: डॉ जितेंद्र सिं
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज इनकोव्हॅक या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं आज लोकार्पण केलं. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं (BBIL), बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स ( (BIRAC))यांच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे. यानिमीत्त झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
लसीकरण सुरू करताना सुरुवातीला दोन मात्रांमध्ये घ्यायची आणि हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणजे आधी घेतलेल्या कुठल्याही प्रकारच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीनंतर घेता येणारी वर्धक मात्रा म्हणून मान्यता मिळालेली, इन कोव्हॅक ही जगातील नाकावाटे घ्यायची पहिली कोविड 19 लस आहे
जगात पुरवठा होत असलेल्या लसींपैकी 65 टक्के लसींचा पुरवठा भारतातून होतो, असं या कार्यक्रमात आनंद व्यक्त करत डॉ. मांडवीय म्हणाले. नाकावाटे घ्यायची जगातील पहिली कोविड लस विकसित केल्याबद्दल BBIL चा चमू आणि जैवतंत्रज्ञान विभागाचं अभिनंदन करून, त्यांनी सांगितलं, “जगातील नाकावाटे घ्यायची ही पहिली कोविड 19 लस भारतानं विकसित करणं, म्हणजे एकप्रकारे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरवास्पद मानवंदना आहे”.
या लसीला प्राथमिक स्तरावरच्या दोन मात्रा आणि हेट्रोलोगोस वर्धक मात्रा म्हणून वापर करण्यासाठी मान्यता दिली जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. सुरवातीला आगाऊ नोंदणी केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जाईल. मोठ्या प्रमाणातल्या खरेदीअंतर्गत या लसीची किंमत ३२५ रुपये इतकी असेल असं या निवेदनात म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com