जग भारताकडे नव्या, आदराच्या दृष्टीनं बघू लागलं असल्यानं नव्या संधी आणि जबाबदाऱ्या समोर आल्या

President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

New opportunities and responsibilities emerged as the world began to look at India in a new, respectful light

जग भारताकडे नव्या, आदराच्या दृष्टीनं बघू लागलं असल्यानं नव्या संधी आणि जबाबदाऱ्या समोर आल्या

जग भारताकडे नव्या, आदराच्या दृष्टीनं बघू लागलं असल्यानं नव्या संधी आणि जबाबदाऱ्या समोर आल्या असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : जग भारताकडे नव्या, आदराच्या दृष्टीनं बघू लागलं आहे. त्यामुळे नव्या संधी आणि जबाबदाऱ्याही समोर आल्या आहेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं. त्या आज ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना बोलत होत्या.President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
हडपसर मराठी बातम्या 
Hadapsar Latest News
 Hadapsar News

भारत जगातल्या सर्वात प्राचीन काळापासून नांदणाऱ्या संस्कृतींपैकी एक आहे. भारताला लोकशाहीची जननी म्हटलं जातं. तरीही आपलं आधुनिक प्रजासत्ताक युवा आहे.

स्वातंत्र्याच्या सुरवातीच्या काळात आपल्याला असंख्य आव्हानं आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागलं. दीर्घ परकीय राजवटीच्या अनेक दुष्परिणामांपैकी दोन परिणाम होते, ते म्हणजे हलाखीचं दारिद्र्य आणि निरक्षरता. मात्र तरीही भारत डगमगला नाही. आशा आणि विश्वास यांच्या बळावर आपण, मानव जगताच्या इतिहासातला अनोखा प्रयोग हाती घेतला. इतका विशाल आणि वैविध्य असणारा जनसमुदाय, एक राष्ट्र म्हणून बांधला जाणं हे केवळ अभूतपूर्व होतं.

आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व भारतीय आहोत, हा विश्वास घेऊन आपण हे साध्य केलं. विविध पंथ आणि असंख्य भाषांमुळे आपण विभागले गेलो नाही, तर जोडले गेलो. म्हणूनच, प्रजासत्ताक लोकशाही म्हणून आपण यशस्वी ठरलो. हेच भारताचं मूलतत्व आहे.

भारताची राज्यघटना लागू झाल्यापासून आतापर्यंतचा नेत्रदीपक प्रवास इतर अनेक देशांसाठी प्रेणादायक ठरला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावली, यासाठी देश बाबासाहेबांचा कायम ऋणी राहील, असं त्या म्हणाल्या.

जगभरात भारताची प्रतिमा हि एक विकसनशील देश बनली आहे. मागच्या वर्षी भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं त्यांनी सांगितलं. आपला देश यंदा G-२० समूहाचं अध्यक्ष पद भूषवत आहे ही अभिमानची गोष्ट असून त्यामुळे आपल्याला विकासाच्या खूप संधी उपलब्ध होणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

विकास आणि पर्यावरण यात संतुलन राखण गरजेचं आहे. त्यासाठी पायाभूत प्राधान्यक्रमांचा फेरविचार करावा लागेल, तसंच पारंपरिक जावन मूल्यांच्या वैज्ञानिक बाजूंकडे लक्ष द्यावं लागेल, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

आपली पुढची पिढी या जगात आनंदात आणि सुखी राहावी यासाठी आपण जीवनशैलीत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी भरड धान्याचं महत्व भारतानं पटवून दिलं, आणि संयुक्त राष्ट्रांनी भारताची सूचना स्वीकारून यंदा राष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केलं, असं त्या म्हणाल्या.

महिला सक्षमीकरण हि आता केवळ घोषणा राहिलेली नाही तर बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनामुळे महिला शिकत आह, त्यांच्यात आत्मविश्वास वाढत आहे, असही त्या म्हणाल्या. अंतराळ क्षेत्रात भारत एक महत्वाचा देश म्हणून उदयाला आला आहे. अंतराळ मोहिमेसाठी गगनयान हा कार्यक्रम सरकारनं सुरु केला आहे. असं राष्ट्रपतीनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *