There is no opposition to Shiv Sena and Vanchit Bahujan Aghadi alliance
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही
– जयंत पाटील
मुंबई : शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
नवे मित्र जोडण्याला कुणाचा विरोध नाही, मात्र मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं, जयंत पाटील यांनी नमूद केलं
कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. तसेच, वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com