कीटकनाशकांची सुमारे 16.8 कोटी रुपये तस्करी उघडकीस

केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय Directorate of Revenue Intelligence हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

About Rs 16.8 Crore Smuggling of Pesticides Revealed

कीटकनाशकांची सुमारे 16.8 कोटी रुपये तस्करी उघडकीस

मुंबई सीमा शुल्क विभागानं उघडकीला आणली कीटकनाशकांची सुमारे 16.8 कोटी रुपये तस्करी

मुंबई : गेल्या एका महिन्यात, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), मुंबई विभागीय युनिटने चिनी पुरवठादारांच्या सक्रीय संगनमताने भारतात तस्करी होत असलेल्या कीटकनाशकांचे अनेक साठे जप्त केले.केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय Directorate of Revenue Intelligence हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई सीमा शुल्क विभागानं कीटकनाशकांची तस्करी उघडकीला आणली असून त्यावर कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटनं कीटकनाशकांचे अनेक साठे जप्त केले आहेत. यामध्ये ‘विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर’ अशा नावाने, क्लोराँट्रानिलिप्रोल, अबॅमेक्टिन बेन्झोएट इत्यादी नावाची कीटकनाशकांची तस्करी केली जात होती.

एका संशयित गटाद्वारे ही तस्करीचा सुरु असल्याचा तपास लागला असून या कारवाईत सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत सुमारे 16.8 कोटी रुपये किमतीच्या 30 मेट्रिक टन वजनाची खेप (कन्साईन्मेंट) जप्त करण्यात आली. चाचणी अहवालात हा माल कीटकनाशक असल्याचे निश्चित झाले आहे.

तपासादरम्यान, जप्त करण्यात आलेल्या काही पुराव्यांवरून असे दिसून येते अशा प्रकारची तस्करी बऱ्याच काळापासून सुरू आहे. हा गट चिनी पुरवठादारांच्या संगनमताने कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तस्करी सुलभ करण्यासाठी चिनी पुरवठादार हेतुपूर्वक, त्यांच्या कागदपत्रांमध्ये कीटकनाशकांना विनाइल एसीटेट इथिलीन कॉपॉलिमर म्हणून चुकीचे घोषित करत होते. तस्करी केलेल्या कीटकनाशकांच्या विक्रीतून मिळणारी अवैध रक्कम हवाला नेटवर्कद्वारे चिनी पुरवठादारांना पाठवली जात होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्यांनी यापूर्वी 300 मेट्रिक टन पेक्षा जास्त कीटकनाशकांची तस्करी केली आहे ज्याची अंदाजे किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *