Bringing tinkering and artificial intelligence into the mainstream will revolutionize education
टिंकरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला मुख्य प्रवाहात आणून शिक्षणात क्रांती घडवणार
टिंकरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला मुख्य प्रवाहात आणून शिक्षणात क्रांती घडवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, आणि इंटेल इंडिया एकत्र येणार
नवी दिल्ली : अटल इनोव्हेशन मिशन – नीती (NITI) आयोग, शिक्षण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, आणि इंटेल इंडिया यांनी औपचारिक अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि टिंकरिंग यासारखी भविष्यातील कौशल्ये अंतर्भूत करून शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एकत्र यायचे ठरवले आहे.
तरुणांचा तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याचा वेग वाढवणे, भविष्यातल्या कौशल्यामधील दरी बुजवण्याची देशाची गरज आणि देशाला कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठी तयार करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधा (अटल टिंकरिंग लॅब- ATLs वगैरे) अनुकूल करणे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी एकत्रितपणे शालेय अभ्यासक्रमात AIoT (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून एक प्रायोगिक उपक्रम सुरु केला.
हे प्रदर्शन हे या पथदर्शी कार्यक्रमाचा परिणाम होता. तसेच, शिक्षकांनी शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर स्वतः तयार केलेल्या AIoT एकीकरण-आधारित पाठ्य अभ्यासक्रम योजनांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी टिंकरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनासह तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AIoT-सक्षम सामाजिक प्रभाव पडणाऱ्या प्रकल्पांचे प्रात्यक्षिक, आणि देशात डिजिटल सज्जता निर्माण करण्याच्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा आणि शिक्षकांसाठी 70 उदाहरणांच्या धड्यांसह एका संग्रहाचे प्रकाशन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम नवी दिल्ली इथल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. राजधानी दिल्ली इथल्या शाळांमधील सुमारे 500 शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर, निवडक विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांचे AIoT प्रकल्प प्रदर्शित करण्याची आणि नीती (NITI) आयोग परिसरात, नीती (NITI) आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com